रासेयो स्वयंसेविका साक्षी पाटील यांच्या विद्यापीठात सन्मान

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । 2020-21 आणि 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यापीठस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना कार्य गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयातील राष्ट्रीय स्वयंसेवा योजनेच्या स्वयंसेविका साक्षी पाटील हिने राष्ट्रीय साहस शिबिर चिखलदरा येथे मुलींचे नेतृत्व केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.

त्याबद्दल धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी. आर चौधरी यांचा कुलूगुरू प्रा.डॉ .व्ही. एल माहेश्वरी, प्रमुख पाहुणे म्हणून रायेसो माजी राज्य संपर्क अधिकारी प्राचार्य डॉ.अतुल साळूंखे, राज्य व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ.प्रा.किशोर पवार, रायेसो संचालक डॉ.सचिन नांद्रे, माजी रायेसो संचालक पंकजकुमार नन्नवरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्याच प्रमाणे राज्यस्तरीय शिबीर नागपूर येथे स्वयंसेवक गौरव राजेंद्र महाजन त्याच प्रमाणे स्वयंसेविका लक्ष्मी बोन्डे यांनी राज्यस्तरीय शिबिरात नेत्तृत्व केल्या बद्दल विद्यापीठात स्वयंसेविका साक्षी पाटील यांनी आपल्या महाविद्यालयातील एककाचे व शिक्षकांचे आभार मानले.

त्यांनी सांगितले कि, स्वयंसेवकांना वेळोवेळी माजी कार्यक्रम अधिकारी डॉ.शरद बिऱ्हाडे सर त्याचप्रमाणे एन. एस. एस कार्यक्रम अधिकारी डॉ.दिपक सूर्यवंशी, सरला तडवी, तसेच प्रा.शेरसींग पाडवी यांचे मार्गदर्शन लाभत असते. म्हणून स्वयंसेवक राष्ट्रीय स्तरावर कौतुकास्पद नावलौकिक करत असतात.

 

Protected Content