Home Cities जळगाव पोलीस दलातील पदोन्नती मिळालेल्या अंमलदार यांचा सत्कार

पोलीस दलातील पदोन्नती मिळालेल्या अंमलदार यांचा सत्कार

0
62

भुसावळ प्रतिनिधी । जिल्ह्यातील पोलीस शिपाई व पोलीस नाईक संवर्गात मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची यादी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी नुकतीच जाहीर केली असून बढती मिळालेल्या पोलीस अंमलदार यांचा भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी दिनांक 19 जुलै 2022 रोजी जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार यांचे पदोन्नती आदेश जारी केले आहे. भुसावळ पोलीस  उपविभागातील  16 पोलीस अंमलदारांना या आदेशान्वये पदोन्नती देण्यात आलेली आहे. पदोन्नती मिळालेल्या पोलीस अमलदार यांची नावे खालील प्रमाणे –

1) रशीद तडवी

2) इब्राहिम तडवी

3) इक्बाल सैय्यद शेख

5)रवींद्र बोराडे

6)विजय पोहेकर

7) प्रेमचंद सपकाळे

8) चंद्रभान बोदडे

9) आत्माराम भालेराव

10) संकेत झांबरे

11)श्रीकृष्ण देशमुख

12)रवींद्र तायडे

13)राहुल चौधरी

14)विकास सातदिवे

15)सोपान पाटील

16) समाधान पाटील

तसेच पोलिस दलातील पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.  सदर सत्कारप्रसंगी पदोन्नती मिळालेले सर्व पोलीस अंमलदार, याशिवाय भुसावळ शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री ठोंबे, भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री भागवत,सहाय्यक पोलीस निरीक्षक दूनगहू याशिवाय भुसावळ शहर पोलीस स्टेशन चे सर्व  स्टाफ हजर होते.

 


Protected Content

Play sound