यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील तहसील कार्यालयात ७८ व्या स्वातंत्रदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महसुल विभागात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ठ कर्मचारी म्हणुन सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यालयाच्या प्रांगणावर तहसीलदार नाझीरकर यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी महसुल प्रशासनात सेवेत कार्यरत असलेले साकळीचे मंडळ अधिकारी सचिन जगताप व अल्पवधीत आपल्या कार्य कर्तव्याने लक्ष वेधणारे नवनियुक्त दहिगावचे तलाठी मिलींद कुरकुरे व आदींचा माजी आमदार रमेश चौधरी, भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी हिरालाल चौधरी, भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे शिवसेना उबाठा पक्षाचे तालुका प्रमुख रवीन्द्र सोनवणे, यावल शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हर्षल पाटील, माजी सभापती नारायण चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जुगल पाटील, मनसेच्या जनहित विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर, काँग्रेसचे हाजी शब्बीर खान, कदीर खान यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय अधिकारी जे. एस. तडवी, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, संगोनिचे नायब तहसीलदार मनोज खारे, यावलचे पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थित हा सन्मान सोहळा पार पडला .