निवडणूकीत मतदान वाढीसाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गटशिक्षणाधिकाऱ्यांचा सन्मान

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नुकत्याच संपलेल्या रावेर-यावल विधानसभा मतदान क्षेत्रात विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या वेळी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रशासकीय पातळीवर घेतलेले महत्वाचे परिश्रम म्हणुन यावल तालुक्यातून लोकशाही शासनव्यवस्था म्हणजे काय, मतदानाच्या हक्काचे महत्व काय आहे, मतदाराला लोकशाही शासनव्यवस्थेत किती महत्व आहे.

मतदार राजा असतो त्याच्या मताने निवडून आलेले लोकप्रतिनिधी राज्य कसे चालवतात इत्यादी बाबत, म्हणजे मतदान जनजागृती कार्यक्रम यावल तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्टाफ, शिक्षण आस्थापना स्टाफ यांनी विविध ठिकाणी गावागावात वाडी वस्तीत प्रभाविपणे राबविल्याने मतदानाची टक्केवारी वाढीस मदत झाली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांतधिकारी बबनराव काकडे यांच्या हस्ते व रावेर तहसीलदार बंडू कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत यांनी काल सन्मानपत्र देऊन यावल पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा गौरव केला. यावेळी यावल पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी व्ही.सी.धनके यांचा प्रांत अधिकारी बबनराव काकडे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले .

Protected Content