पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील पळासखेडे हद्दीत तरवाडे खुर्द गावाजवळ ३० मार्च रोजी पळासखेडे येथील ३५ वर्षीय महिला पुष्पा पाटील हिने प्रियकराच्या मदतीने पतीचा अपघाताचा बनाव करून खून केला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस पाटील राजपाल चौधर यांनी भेट घेवून मयताची ओळख पटवित आरोपींना पकडून देण्यास मदत केली. यामुळे भडगाव पोलीसांकडून पो.पा. राजपाल चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशाी की, तरवाडे खुर्द गावाजवळ एकाचा खून झाला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पाटील राजपाल तापीराम चौधरी यांनी तरवाडे येथील मक्का काढण्याचे सीजन सूरू असल्याने मजूर ट्रॅक्टर घेऊन भडगाव येथे मक्का काढण्यासाठी गेलेले असताना त्यांना रात्रीच्या वेळेस मक्का काढून घराकडे तरवडे येथे येत असताना ट्रॅक्टरवरचे मजुरांना महिला पडलेली दिसली. साडेबारा ते एक वाजेला तरवाडेकडे येत असताना मृतदेह पडलेला दिसून आला. त्यांनी तात्काळ राजपाल चौधरी तरवड्याचे पोलीस पाटील यांना मोबाईल वरून संपर्क केला आणि सांगितले की पळसखेड्याच्या हद्दीमध्ये मृतदेह पडलेले आहे पोलीस पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन कुठलीही भीती व परवा न करता मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन. मयताची ओळख पटविण्यास मदत केली. त्याबद्दल भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग विठ्ठल पवार यांनी भडगाव पोलीस स्टेशन येथे तरवाडे खुर्दचे पोलीस पाटील राजपाल तापीराम चौधरी यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी भडगाव पोलीस उपनिरीक्षक पालकर व शेखर डोमाळे उप पोलीस निरीक्षक यासंह भडगाव तालुका पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.