जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता बारावी व दहावीच्या परीक्षेत शाळेमधून प्रथम, द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला. प्राचार्या सुषमा कंची यांनी विद्यार्थ्यांशी पुढील करिअरबाबत हितगुज केली.
इयत्ता बारावीतील विद्यार्थिनी पलक हेमंत चिरमाडे ही 88.80 टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. चिन्मय ललित तावडे या विद्यार्थ्याने 84.60% गुण मिळवत शाळेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या विद्यार्थ्यांचा त्याच्या पालकांसह सत्कार करण्यात आला. तसेच इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या धवल प्रफुल्ल पाटील याने 98.20 टक्के गुण प्राप्त केले आहे. या विद्यार्थ्यांचा त्याच्या पालकांसह सत्कार करण्यात आला. तसेच समृद्धी विष्णू वानखेडे हिने 96.00 टक्के गुण मिळवून शाळेत दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. तिचा देखील पालकांसह सत्कार झाला. प्राचार्या सुषमा कंची यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, सचिव अँड. प्रमोद पाटील, कोषाध्यक्ष डी .टी. पाटील आणि प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
8 months ago
No Comments