Home Cities भडगाव शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार

शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार


भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नुकताच महाराष्ट्र राज्य टीचर्स असोसिएशनच्या संस्थापक तथा राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांच्या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाला शिवसेना नेते संजयजी राऊत तसेच विनायकजी राऊत अध्यक्ष म्हणून लाभले.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बालविकास शाळेचे उपशिक्षक सागर विलास महाजन यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला सुनीलजी शिंदे, कुणालजी पाटील, राजेंद्रजी फाळके, आमशा दादा पाडवी, सुनील भाऊ बागुल, अद्वय हिरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर उपस्थितांना स्नेहभोजन देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला आला. सागर महाजन यांचा सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound