भुसावळ प्रतिनिधी । इंदिरा गांधी राष्ट्रीय ज्ञानपीठ द्वारा आयोजित मुंबईत पुरस्कार सन्मान सोहळ्यात ताप्ती पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका नीना कटलर व चित्रकला शिक्षक हर्षानंद सोनवणे यांना राष्ट्रीय शिक्षा सन्मान पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंधेरी पूर्व, मुंबई येथील हॉटेल कोहिनूर कँटीनेंटल येथे झालेल्या राष्ट्रीय शिक्षा सन्मान कार्यक्रमात माजी चेअरमन महाराष्ट्र राज्य हिंदीसाहित्य अकॅडमीचे माजी अध्यक्ष डॉ. दामोदर खडसे, औरंगाबाद येथील धर्मदाय आयुक्त शरद वाळके, निर्माता-दिग्ददर्शक-मास्टर-विनायक फिल्मस् मुंबईचे जयप्रकाश कर्नाटकी, हिंदी सिनेमा गायक घनश्याम वासवानी, हिंदी, मराठी चित्रपट नायिका जयश्री टी, हिंदी, मराठी चित्रपट नायक प्रदीप वेलनकर, कॉपरेट कॉम्युनिकेशनच्या संगीता चाक्को, व्यापारी व सामाजिक कार्यकर्ता परभणी राजेंद्र मगर, मयुरी शुभानंद नायिका, मॉडेल, फॅशन डिझायनर मयुरी शुभानंद, इंदिरा गांधी ट्रस्टचे संचालक जी.एस.राहणे या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत ताप्ती पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका नीना कटलर व चित्रकला शिक्षक हर्षानंद सोनवणे यांना राष्ट्रीय शिक्षा सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सचिव विष्णु चौधरी यांच्यासह ताप्ती पब्लिक स्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.