बँकेच्या कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा; दिड लाखांचे सोने केले परत

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आजच्या युगातदेखील माणुसकी व  प्रामाणिकपणा आहे. जळगाव येथील तरुण साकळी आय.डी.बी.आय बँकेचे कर्मचारी राहूल ठाकूर याचे उत्तम उदाहरण ठरले आहेत. एका जेष्ठ नागरिकांनी बँकेत विसरलेले दिड लाखांचे सोने त्यांनी स्वतः संपर्क साधत परत केले आहे.

याविषयीची अधिक माहिती अशी की, “चुंचाळे येथील बँकेचे ग्राहक साहेबराव रामदास पाटील हे जेष्ठ नागरिक बँकेत गोल्ड लोनसाठी गेले होते मात्र बँकेत गर्दी खूप असल्याने व वयोमानानुसार ते गोल्ड लोनसाठी आणलेले सोने राहूल ठाकूर यांच्या टेबलावर विसरून घरी निघून आले.

ही बाब दोन तासानंतर गोल्ड लोन कर्मचारी राहूल ठाकूर यांच्या लक्षात येताच त्यांनी कोणताही विलंब न करता त्यांना स्वतःहून फोन करून याबाबतची माहिती सांगितली व ते सोन्याचे दागिने सिल करून आपल्या कपाटात ठेवले असून आपले सोन्याचे दागिने सुरक्षित असल्याचे माहीती दिली.

माहिती मिळताच त्यांनी गोल्ड लोन कर्मचारी राहूल ठाकूर यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांचे आभार मानले त्यांच्या या प्रामाणिकपणाचे साकळीसह परीसरात कौतुक होत आहे

शाखाधिकारी सतीश पाटील, बँक कर्मचारी अनिल बानाईत, चुंचाळे पोलीस पाटील गणेश पाटील, वसंत महाजन, शारदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे कार्याध्यक्ष सुभाष महाजन, यावल खरेदी विक्री संघाचे संचालक सुनिल नेवे चुंचाळे, माजी ग्रा.प.सदस्य दिपक नागो पाटील, डॉ सुनिल पाटील साकळी, प्रगतीशिल शेतकरी विलास पाटील, पत्रकार चंद्रकांत नेवे, शिरसाड ग्रामपंचायत सदस्य तेजस पाटील, योगेश साहेबराव पाटील यांच्यासह परिसरातील बँकेचे ग्राहक यांनी त्यांचें कौतुक केले.”

आमच्या बँकेच्या ग्राहकाचे बँकेत राहिलेले सोने मी प्रामाणिकपणे परत केलेले असून माझ्या या कृतीने बँक व ग्राहक यांचे नाते अधिकच दृढ होण्यास मदत निश्चितच मदत होणार आहे. माझ्या आई-वडिलांच्या संस्कारातूनच माझ्या अंगी प्रामाणिकपणा हा गुण मिळालेला असून या गुणामुळेच माझ्या हातून हे चांगले सत्कर्म घडले असल्याचा मला मनस्वी आनंद आहे. असे लोन ऑफिसर राहुल ठाकूर यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितले. 

याविषयीची अधिक माहिती अशी की, “चुंचाळे येथील बँकेचे ग्राहक साहेबराव रामदास पाटील हे जेष्ठ नागरिक बँकेत गोल्ड लोनसाठी गेले होते मात्र बँकेत गर्दी खूप असल्याने व वयोमानानुसार ते गोल्ड लोनसाठी आणलेले सोने राहूल ठाकूर यांच्या टेबलावर विसरून घरी निघून आले.

ही बाब दोन तासानंतर गोल्ड लोन कर्मचारी राहूल ठाकूर यांच्या लक्षात येताच त्यांनी कोणताही विलंब न करता त्यांना स्वतःहून फोन करून याबाबतची माहिती सांगितली व ते सोन्याचे दागिने सिल करून आपल्या कपाटात ठेवले असून आपले सोन्याचे दागिने सुरक्षित असल्याचे माहीती दिली.

माहिती मिळताच त्यांनी गोल्ड लोन कर्मचारी राहूल ठाकूर यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांचे आभार मानले त्यांच्या या प्रामाणिकपणाचे साकळीसह परीसरात कौतुक होत आहे

शाखाधिकारी सतीश पाटील, बँक कर्मचारी अनिल बानाईत, चुंचाळे पोलीस पाटील गणेश पाटील, वसंत महाजन, शारदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे कार्याध्यक्ष सुभाष महाजन, यावल खरेदी विक्री संघाचे संचालक सुनिल नेवे चुंचाळे, माजी ग्रा.प.सदस्य दिपक नागो पाटील, डॉ सुनिल पाटील साकळी, प्रगतीशिल शेतकरी विलास पाटील, पत्रकार चंद्रकांत नेवे, शिरसाड ग्रामपंचायत सदस्य तेजस पाटील, योगेश साहेबराव पाटील यांच्यासह परिसरातील बँकेचे ग्राहक यांनी त्यांचें कौतुक केले

आमच्या बँकेच्या ग्राहकाचे बँकेत राहिलेले सोने मी प्रामाणिकपणे परत केलेले असून माझ्या या कृतीने बँक व ग्राहक यांचे नाते अधिकच दृढ होण्यास मदत निश्चितच मदत होणार आहे. माझ्या आई-वडिलांच्या संस्कारातूनच माझ्या अंगी प्रामाणिकपणा हा गुण मिळालेला असून या गुणामुळेच माझ्या हातून हे चांगले सत्कर्म घडले असल्याचा मला मनस्वी आनंद आहे. असे लोन ऑफिसर राहुल ठाकूर यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितले. 

Protected Content