रावेर प्रतिनिधी । बेकायदेशीर गौण खनिजाचे डंपर पकडण्यासाठी प्रांतधिकारी कैलाश कडलक मध्यरात्रीची जोखीम घेतात, तर तालुक्यात महसूल पथकाने जप्त केलेल्या ट्रक्टर टॉली सोडुन देतात. दोन्ही घटना महसूल विभागाशी संबंधित असून एकीकडे एकीकडे प्रामाणिकतेच कर्तव्य स्पष्ट तर दूसरीकडे कर्तव्याला तिलांजली दिल्याचे दिसते.
काल मध्यरात्री प्रांतधिकारी कैलास कडलक व चालक उमेश तळेकर गुप्त माहितीवरुन डंपरवर कारवाई करण्यासाठी निघतात व अवैध गौण खनिज चालक मध्य रात्री दादागिरी करून प्रांतधिकारी यांच्या गाडीवर हल्ला केला होता. या घटनेचा सर्वस्तरातुन निषेध व्यक्त होत आहे. तर प्रांतधिकारी कैलास कडलकच्या हिमतीची सर्वस्तरातून कौतुक होत आहे. तर इकडे दि १० फेब्रुवारीला रावेर महसूल पथकाने जप्त ट्रक्टर ट्रॉली सोडुन दिली होती. दोन्ही घटनामध्ये प्रामाणिकतेच विरोधाभास आहे.
डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांना निवेदन
आज दिवसभर महसूल विभागा तर्फे काम बंद आंदोलन करण्यात आले रावेर तहसिलदार उषाराणी देवगुणे यावल तहसिलदार महेश पवार नायब तहसिलदार संघटना तलाठी संघटना कोतवाल संघटेने तर्फे हल्लाचा निषेध करून उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.