अमळनेर प्रतिनिधी । महाविकास आघाडी सरकारने वाढीव वीजबिल संदर्भात कोणतीही सवलत न देता जनतेला संपूर्ण बिले भरण्याबाबत आदेश काढले आहेत. या नाकर्त्या सरकारच्या विरोधात वीज बिलांची होळी करून आंदोलन भाजपातर्फे करण्यात आले. देशाबरोबर जगावर पसरलेल्या कोरोना महामारी मुळे जनतेला कामधंदा बंद करून घरात थांबावे लागले. आणि या संकटात जनतेला राज्य सरकारने मदत तर अजीबात केलीच नाही,, उलट अव्वाच्या सव्वा विज बीलं जनतेला पाठवली. कामधंदा नसल्याने सर्व सामान्य जनेतेला पाठवलेले हे विज बील म्हणजे फारच मोठे संकट आहे. हि बिलं पुर्ण माफ करण्यात यावेत म्हणून आमदार स्मिता वाघ यांच्या नेतृत्वात कपीलेश्वर महादेव मंदिर, नीम(कपीलेश्वर ) येथे लाईट बील माफ न करणाऱ्या आघाडी बीघाडी सरकारचा निषेध नोंदवून विज बीलांची होळी करण्यात आली. याप्रसंगी माजी आमदार स्मिताताई वाघ, शहराध्यक्ष उमेश वाल्हे, पं.स. सभापती रेखा पाटील, सरचिटणीस जिजाबराव पाटील, राकेश पाटील, विजय राजपूत, राहुल पाटील व बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
अमळनेरात भाजपतर्फे कपिलेश्वर मंदिरावर वीज बिलांची होळी
4 years ago
No Comments