Home Cities मुक्ताईनगर मोठी बातमी : आ. एकनाथ खडसे यांचा विश्वासू सहकारी आज शिवसेनेत दाखल...

मोठी बातमी : आ. एकनाथ खडसे यांचा विश्वासू सहकारी आज शिवसेनेत दाखल होणार !

0
617

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगरच्या राजकीय वर्तुळात सध्या मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. आ.एकनाथराव खडसे (राष्ट्रवादी गट) यांचे मागील पंचवीस ते तीस वर्षांपासूनचे विश्वासू सहकारी असलेले एक अल्पसंख्यांक मातब्बर नेते लवकरच शिवसेनेमध्ये (शिंदे गट) प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

या उच्चस्तरीय पक्षप्रवेशाची बातमी समोर आल्याने एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का बसण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. हा महत्त्वाचा पक्षप्रवेश आज शुक्रवार, १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, पक्षप्रवेश करणाऱ्या या मातब्बर नेत्याचे नाव अद्याप शिवसेनेकडून (शिंदे गट) अधिकृतपणे घोषित करण्यात आलेले नाही. त्यामुळे या नावाबाबत सर्वसामान्यांमध्ये आणि राजकीय निरीक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

आ.चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा अल्पसंख्यांक नेता शिवसेनेत (शिंदे गट) दाखल होणार असल्याचे निश्चित झाले आहे. या नेत्यासोबत केवळ काही कार्यकर्तेच नव्हे, तर असंख्य निष्ठावान कार्यकर्ते एकाच वेळी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे मुक्ताईनगर मतदारसंघातील आगामी स्थानिक आणि विधानसभा निवडणुकीच्या राजकीय गणितांवर थेट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीच्या गटातील या ‘मातब्बर’ नेत्याच्या प्रवेशामुळे भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीला निश्चितच बळ मिळेल, असे मानले जात आहे.


Protected Content

Play sound