जळगाव प्रतिनिधी । ईद निमित्त खरेदी करण्यासाठी पायी जात असलेल्या बाप- मुलगा यांना मागून येणाऱ्या दुचाकीचा धक्का लागला. याचा जाब विचारल्याकारणावरून दोन जणांनी दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना आज घडली असून अज्ञात मुलांविरोधात शहर पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिलाल खान गुलाब खान (वय-45) आणि त्यांचा मुलगा कादीर खान बिलाल खान (वय-21) दोन्ही रा. उस्मानिया पार्क हे दोन्ही बाप बेटी ईदनिमित्त खरेदी करण्यासाठी बाजारातील फुले मार्केटमध्ये पायी आले. दुपारी 2 वाजेच्या सुमारास पायी जात असतांना त्यांना मागुन दुचाकीचा धक्का लागला. धक्का लागल्याचा जाब बिलाल खान यांनी मुलांना विचारल्याने राग आला. सिंधी कॉलनीतील दोन मुलांनी दोन्ही बाप-लेकाला बेदम मारहाण केली. या बिलाल खान यांना डोक्याला मार लागल्याने रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ही घटना फुलेमार्केट जवळ झाली असून मारहाण करणाऱ्या दोघांविरोधात शहर पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.