चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील हिरापूर येथील जय अंबे मित्र मंडळाच्या वतीने गावातून साई पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी तालुक्याचे युवा नेते मंगेशदादा चव्हाण यांच्याहस्ते साईबाबांची भक्तिभावाने आरती करण्यात आली. तसेच मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे जमलेल्या सर्व भाविक भक्तांना यावेळी अन्नदान करून गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यात आल्यात. यावेळी हिरापूर ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.