चाळीसगाव (प्रतिनिधी) पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चाळीसगाव येथील हिरकणी महिला मंडळाचे स्वयंसेवक रवाना झाले आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात महापुराने थैमान घातला असून यात नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. या संकटात अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. तर अनेक नागरीक बेघर झाले असून पुराच्या पाण्यामुळे अनेकांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. अशा संकटसमयी महाराष्ट्रातील अनेक भागातून मदत दिली जात आहे. शहरातील हिरकणी महिला मंडळाच्या वतीने किराणा साधनसामग्री,गृहोपयोगी साहित्य इत्यादी गरजेच्या वस्तूचे वितरण करण्यात येणार असून श्रमदान केले जाणार आहे. शहरातील हिरकणी महिला मंडळाच्या स्वयंसेवकांचा चमू आज सांगली,कोल्हापूरमधील 11 भागाकडे रवाना झाला असून यात ‘एक हात मदतीचा’ या अंतर्गत साधनसामग्री वितरणासोबत स्वच्छता मोहीम,कचरा निर्मुलन आदींवर भर दिला जाणार आहे.