हिरकणी महिला मंडळातर्फे गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

40 gaon

 

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील हिरकणी महिला मंडळातर्फे खडकीसिम येथील गिरणा विद्या प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक शाळेत आज दि. 4 सप्टेंबर रोजी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, आज महागाईच्या काळात शिक्षण परवडत नसल्यामुळे अनेकजण शिक्षण सोडून देतात. शिक्षण किती महत्वाचे हे सर्वांना माहित आहे. अर्ध्यावरती शिक्षण सोडणार्‍या विद्यार्थ्यांना आज सामाजिक बांधिलकीतून मदत मिळाली तर ते आपले स्थान निर्माण करु शकतील, असे स्वप्निल कोतकर यांनी कार्यक्रमाप्रसंगी सांगितले. तसेच हिरकणी महिला मंडळाच्या उपक्रमामुळे आज समाजातील गरजु विद्यार्थ्यांना मोठी मदत मिळणार आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यरुपी देणगी मिळाल्याने शैक्षणिक अडचण उद्भवणार नसल्याचे मुख्याध्यापक जी.ई.अहिरराव यांनी सांगितले.

यावेळी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना उपयोगी पडणाऱ्या आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. दफ्तर, वह्या, कंपास, पेन आदी शालेय साहित्याचा समावेश आहे. यावेळी हिरकणी महिला मंडळाच्या संस्थापिका सुचित्रा पाटील, वैष्णवी पाटील, मुख्याध्यापक जी.ई. अहिरराव, उपशिक्षक सुबोध वाघ आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तसेच आभार शिक्षिका आर.टी.संदानशीव यांनी मानले यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजक अभियंता सोनवणे(पुणे) यांचे मोलाचे सहकार्य लाभले तर सुबोध वाघ, एन.एल.चव्हाण, सी.जी.वंजारी, एस.डी.पवार, सपकाळे मॅडम, हेमराज पाटील, सचिन पाटील, भाऊसाहेब दाभाडे, मनोज देशमुख, विरेंद्र सूर्यवंशी, प्रशांत सोनवणे आदींनी अथक परिश्रम घेतले.

Protected Content