भुसावळ लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या सरपंचपदासाठी निवड करण्यात आली. यामध्ये सरपंचपदी हिराबाई कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
भुसावळ तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायत मध्ये दोन वर्षांपूर्वी सरपंचपदी योगिता विष्णू सपकाळे यांची निवड करण्यात आली होती. दरम्यान त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेले जातप्रमाणपत्र हे अवैध ठरल्यामुळे त्यांना सरपंच पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. गेल्या ६ महिन्यांपासून सरपंच लपद हे रिक्त होते. त्यामुळे सरपंचपदाचा प्रभारी चार्ज हा उपसरपंच सागर सोनवाल यांच्याकडे देण्यात आला होता. या अनुषंगाने साकेगाव ग्रामपंचायत मध्ये सरपंचपदाची निवड करण्यात आली. यामध्ये सरपंचपदी हिराबाई गणेश कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी माजी सरपंच आनंद ठाकरे, उपसरपंच सागर सोनवाल, अनिल पाटील, दिलीपसिंह पाटील, सुरेश पाटील, सुभाष कोळी, माणिक कोळी, ग्रामपंचायत सदस्य सचिन सपकाळे, भूषणसिंग राजपूत, अशोक सपकाळे, सुनीता सोनवणे, माधुरी गजानन पवार, संगीता विलास ठोके यांच्यासह आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.