यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील हिंगोणा येथील जागृत मुंजोबा यात्रोत्सव आज भरत असून याला भाविकांची गर्दी उसळली आहे.
हिंगोणा येथील यात्रोत्सव माघ महीन्याच्या दुसर्या वाराला भरत असतो सालाबाद प्रमाणे या वर्षाला मुंजाचा दुसरा शनिवारी असल्यामुळे यात्रोत्सव भरत आहे. मागील दोन वर्षांत कोरोना संसर्ग प्रार्दुभावामुळे शासनाने सर्वच सार्वजनीक कार्यक्रमांवर बंदी आणली होती.मात्र सध्या कोरोना संसर्ग पुर्णपणे हद्दपार झाल्याने जिल्ह्यात सार्वजानिक कार्यक्रम उत्सव, यात्रा साजरे केले जात आहेत.
हिंगोणा येथिल भाविकांचे श्रध्दास्थान असणार्या मुंजोबा महाराज मंदिरात आज परंपरेनुसार यात्रा भरत आहे. यंदा यात्रोत्सव मोठया उत्साहात भरणार आहे. या कार्यक्रमाकरीता परिसरातील तरूण वर्गाचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. यात्रेनिमित्त गावात पाळणे मुलांचे खेळ्ण्याचे दुकाने लागली आहे यामुळे गावातील व परिसरातील श्रद्धालु भाविकांमध्ये भक्तीमय व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .
दरम्यान, पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मनोज वायकोळे . भरत पाटील . भुषण राणे . सागर महाजन . विष्णु गाजरे .भरत नेहेते . हितेंद्र महाजन यांनी केले आहे. तर, फैजपुर पोलीस ठाण्याचे पोलिस सहाय्यक पोलीस निरिक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेत पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे.