यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील विनापरवाना वृक्षतोड करणाऱ्यांकडून धोका निर्माण झाल्याने हिंदवी स्वराज्य सेनेला सुरक्षा मिळावी या मागणीसाठी यावल पोलीस ठाण्याचे निरिक्षक सुधीर पाटील यांना निवेदन देण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मध्ये होणारी झाडांची अवैध कत्तल थांबवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, सह उपमुख्यमंत्री, पर्यावरणमंत्री यांच्या कडे निवेदन दिले आहे. याचा राग येवुन किनगाव व परिसरातील काही जंगलतोड करणारे सतत कार्यकर्त्यांचा पाठलाग करणे तसेच इशारे करून धमक्या देणे, शिवीगाळ करणे असे प्रकार घडत आहे. वृक्षतोड करणाऱ्यांपासून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. पोलीसांनी संघटनेच्या पदाधिकारी व कुटुंबास सुरक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
या बाबतचे निवेदन हिंदवी स्वराज्य सेना उत्तर महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष राहुल कडू पाटील, जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, ऍड. याकुब तडवी, समाधान पाटील, संभाजी पालवे, प्रेमसागर सोनवणे, सागर पाटील, अक्षय पाटील सह आदींची उपस्थिती होती.