Home Cities यावल भाजपा ओबीसी सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी हेमराज फेगडे यांची निवड

भाजपा ओबीसी सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी हेमराज फेगडे यांची निवड

0
77

यावल प्रतिनिधी । येथील समाजसेवक हेमराज फेगडे यांची भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शहरातील धनश्री चित्र मंदीरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बुथ कार्यकर्ता मेळाव्यात माजी मंत्री गिरीष महाजन, आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. याप्रसंगी खासदार रक्षाताई खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्याभरातून अभिनंदन करण्यात येत आहे.  याप्रसंगी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन खासदार रक्षाताई खडसे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे, आमदार संजय सावकारे,  जिल्हा परिषद अध्यक्ष रंजनाताई पाटील, जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती रवींद्र पाटील, हिरालाल चौधरी, भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, शहराध्यक्ष डॉ . निलेश गडे , कृषी भुषण नारायण चौधरी, नगरसेवक डॉ . कुंदन फेगडे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राकेश फेगडे यांच्यासह सर्व समाज बांधव व मान्यवरांनी आणि पदाधिकाऱ्यांनी हेमराज फेगडे यांचे स्वागत करून अभिनंदन केले.

 


Protected Content

Play sound