भुसावळच्या सातपुडा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, दादासाहेब आर. जी. झांबरे विद्यालयातील (आधीचे भुसावळ हायस्कूल, भुसावळ ) पर्यवेक्षक तथा जिल्हा माध्यमिक शिक्षकांच्या पतपेढीचे उपाध्यक्ष हेमंत जीवराम चौधरी सर यांचा आज वाढदिवस. यानिमित्त त्यांच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा.

हेमंत जीवराम चौधरी हे सातपुडा शिक्षण संस्थेत दिनांक १ मार्च १९९७ रोजी कनिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत झाले. यानंतर वरिष्ठ लिपीक झाल्यानंतर एम.ए. इंग्रजी बी.एड. पूर्ण करून ते शिक्षक पदावर रूजू झाले. आज याच विद्यालयात ते पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ख्याती अर्जीत करणारे हेमंत चौधरी सर हे बहाआयामी व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी शिक्षक व पर्यवेक्षक म्हणून आपल्या गुणवत्तेची मोहर तर उमटवलीच आहे. पण सातपुडा शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य आणि सध्या उपाध्यक्ष म्हणून त्यांची कारकिर्द ही अतिशय उज्वल अशीच आहे. संस्थेच्या भरभराटीसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले असून याचमुळे संस्था आज प्रगतीपथावर असल्याचे दिसून येत आहे.

एकीकडे आपले विद्यालय आणि संस्थेच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटत असतांनाच त्यांनी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हितासाठी देखील भरीव प्रयत्न केले आहेत. त्यांच्या कार्यकुशलतेची पावती म्हणून त्यांना शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतपेढीवर संचालक म्हणून भुसावळ तालुक्यातून दुसऱ्यांदा निवडून दिले आहे. तर, संस्थेचे चेअरमन एस.डी. भिरूड यांनी त्यांच्यावर आता उपाध्यक्षपदाची धुरा सोपविली असून या पदाला त्यांनी खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. संस्थेच्या सभासदांचा अपघाती मृत्यू झाल्यास पंचवीस लाख रूपयांची मदत, कर्जफेडीच्या हप्त्यांमध्ये वाढ आदी सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
हेमंत चौधरी सर हे गेल्या तब्बल २७ वर्षांपासून माध्यमिक लोकशाही आघाडी म्हणजेच टिडीएफमध्ये सक्रीयपणे कार्यरत आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेळेवर वेतन व्हावे यासाठी ते सातत्याने झटत असतात. तसेच टिडीएफच्या प्रचार आणि प्रसारासाठी देखील त्यांनी भरीव कार्य केले आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले, ग्रॅज्युईटी, निवृत्ती वेतन, प्रॉव्हीडंट फंड आदींच्या समस्यांसाठी ते सातत्याने पाठपुरावा करत असतात.
हेमंत चौधरी सर हे समाजात आणि विशेष करून तरूणाईत संस्कार पेरण्याचे काम देखील सातत्याने करत आहेत. गणेशोत्सव, शिवजयंती आदींच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधनाचे काम केले आहे. या माध्यमातून त्यांनी आपली शाळा, संस्था, पतपेढी आणि टिडीएफ यांच्या जोडीला समाजसेवेचा मापदंड प्रस्थापित केला आहे. याची दखल घेऊन हेमंत चौधरी सरांना २०१५ साली शिक्षक सेवा संमेलनात ‘शिक्षक गौरव’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
चौधरी सर हे विद्यार्थी हिताच्या सोबतच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असून याचमुळे शैक्षणिक क्षेत्रातील सहृदयी व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. आगामी काळात याच तडफेने काम करण्याचा त्यांचा संकल्प आहे. अशा कर्तबगार व्यक्तीमत्वाला वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !



