रेल्वे अपघातातील मृतांना प्रत्येकी पाच लाखांची मदत !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | परधाडे रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातातील मृतांना राज्य सरकारने प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत जाहीर केली असून जखमींवर मोफत उपचार करण्यात येत आहेत.

या संदर्भातील वृत्त असे की, माहेजी तर परधाडे रेल्वे स्थानकाच्या दरम्यान आज भीषण अपघात घडला. यात पुष्पक ए क्स प्रेसमधील प्रवाशांनी आग लागल्याच्या भितीतून रेल्वे रूळांवर उडी मारली असता समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने या लोकांना चिरडले. यात ११ जणांना मृत्यू झाला असून काही प्रवासी जखमी झाले आहेत.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी तात्काळ पाचोरा येथील अपघातस्थळ गाठले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दावोसमधून संदेश जारी करत मृतांना प्रत्येकी पाच लाखांची मदत तर जखमींवर मोफत उपचार करण्यात येतील असे जाहीर केले आहे.

Protected Content