

जळगाव प्रतिनिधी । शहरातल्या शिवाजीनगर भागातल्या आगग्रस्तांना मणियार बिरादरीतर्फे जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात मदत करण्यात आली.

शिवाजी नगर रेल्वे पुला खालील झोपडपट्टीला आग लागल्याने १६ कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे. यामुळे जळगाव जिल्हा मानियार बिरादरी व शेख फाउंडेशनतर्फे त्यांना मदत करण्यात आली. या कुटुंबांना गृहोपयोगी प्रत्येकी २० भांड्याचे सेट दारूल कझा चे प्रिन्सिपॉल तथा जमियतचे अध्यक्ष मुफ्ती आतिकुर रहेमान, कुल जमातीचे सचिव डॉ जावेद शेख,बिरादारीचे अध्यक्ष फारूक शेख, पत्रकार संघाचे रितेश भाटिया व प्रवीण ठाकरे यांच्या हस्ते वाटण्यात आले. फारूक शेख यांनी प्रास्तविका द्वारे झोपडपट्टी ची आगीची माहिती देऊन शासनाने यांना सहकार्य करावे असे विचार मांडले तर मुफ्ती अतिकूर रहेमान यांनी त्यांना धीर देऊन धिरा (सब्र)बाबत कुराण मधील श्लोक व त्याचा अर्थ समजविला. डॉ जावेद यांनी वैद्यकीय सहकार्य करण्याचे सांगितले. या मदतीसाठी बिरादारीचे अब्दुल रऊफ,अलताफ शेख,
मुस्तकिम शेख,आरिफ शेख,तसेच मोहसीन शेख,रईस अहेमद, यांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी विजय जगन्नाथ ठाकरे, इक्बाल शेख मणियार, महेश कुलीचंद पाटील, इस्माईल जुम्मा गवळी,सादिक जुम्मा गवळी, हुसेन जुम्मा गवळी, शेख सुबराबाई बाबूलाल मणियार, शकीला नारायण कोळी, शेख अन्वर शेख इब्राहिम, प्रवीण अशोक पाटील, शेख शकीला शेख, शकील शेख इस्माईल शेख अहमद,गंगा हरिशचंद पवार,कमलबाई लाला पाटील, विठ्ठल बापूराव तळोकार व मंगेश रामसिंग ठाकूर मदत करण्यात आली.


