Home राज्य मुंबईसह‍ इतर भागात अतिवृष्टीचा इशारा

मुंबईसह‍ इतर भागात अतिवृष्टीचा इशारा

0
34


mumbai

मुंबई प्रतिनिधी । मुंबई येत्या २४ तासात मुंबई, नवी मुंबई ठाण्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान वेगाने दिले आहे. राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्सव सुरू असताना काल (बुधवार) मुसळधार पावसाने मुंबई, ठाणे, पालघर, कोकण आणि राज्यातील इतर भागात त्रेधातिरपीट उडवली असून नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली.

मध्यरात्रीनंतर पावसाने उसंत घेत दिलासा दिला असला, तरी आजही दि.5 सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे आणि कोकणात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. तसेच आवश्यकता नसल्याच कोणी घराबाहेर पडू नये, असे देखील सांगण्यात आले आहे. तसेच मध्य, हार्बर व पश्चिम अशा तीनही उपनगरी रेल्वेमार्गांना बसलेला त्याचा फटका… साचलेल्या पाण्यामुळे जागोजागी निर्माण झालेल्या तळ्यांनी रोखलेली रस्तेवाहतूक नागारिकांचे प्रचंड हाल होत आहेत.


Protected Content

Play sound