जळगावातील कापड दुकानाला भिषण आग; लाखोंचा मुद्देमाल नष्ट

जळगाव-लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील श्यामा मुखर्जी उद्यान परिसरातील एका कापडाच्या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने दुकानातील अंदाजे पाच ते सहा लाखांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची थरारक घटना मध्यरात्री घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रमोद सोनवणे यांच्या शहरातील श्यामा मुखर्जी उद्यान परिसरात मालकीची कापडाची दुकान आहे. मात्र मध्यरात्री १२ ते १ च्या सुमारास अचानक शॉर्टसर्किटमुळे दुकानाला आग लागली. आग एवढी भिषण होती की, क्षणार्धात होतेचे नव्हते झाले. दुकानातील विक्रीसाठी असलेले कपडे आणि शिलाई मशीन आदी जळून नष्ट झाले. तब्बल ५ ते ६ लाखांचा नुकसान यावेळी झाल्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसेच दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान सदर घटना घडताच अग्निशमन विभागातील जवान वाहनचालक देविदास सुरवाडे फायरमन रोहिदास चौधरी, भगवान पाटील, इकबाल तडवी, संतोष तायडे यांनी फायर गाडीच्या मदतीने आग विझवण्यास मदत केली. तत्पूर्वी या घटनेची माहिती जिग्नेश सोनवणे यांनी आज सकाळी साडेसातच्या सुमारास दिली असून या घटनेबाबत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Protected Content