बुलडाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नांदूरा तालुक्यातील बेलुरा गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. गावातील दाम्पत्याने कर्जबाजारीला कंटाळून राहत्या घरात विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
वसंत जगदेव डांबरे (वय-७०) आणि सरलाबाई वसंत डामरे (वय-६५) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकरी दांपत्याचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, शेतकरी म्हंटला की आपल्या काळया मातीला जिवापाड जपतो. पण जेव्हा तो आर्थिक व आसमानी आणि सुलतानी संकटात सापडतो तर त्याच काळया मातीला सोडून तो शेवटचा श्वास घेतो. काय असं घडलं बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरातील शेतकऱ्या दांपत्यसोबत की त्यांचा तब्बल ४० वर्षा पेक्ष्या जास्त संसार त्यांना अर्ध्यावरच सोडून शेवटचे श्वास देखील सोबत घ्यावे लागले. दोन एकर शेती त्यातही उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ नाही. आधी अतिवृष्टी कधी दुष्काळ तर कधी रोगराई उत्पन्न घेण्यासाठी लागणारा खर्चच मोठा. त्यातील ६ ते ७ जणांचे कुटुंब २ एकर शेतीत कसं भागणार? हे आवाचून उभे असलेले प्रश्न त्या दोघांना पडला. आयुष्यभर दोघांनी एकमेकांच्या साथीने संसाराचा गाडा कष्टाने चालवला .मात्र आयुष्याच्या संध्याकाळी संकट आणि त्रस्त झाल्याने संसाराचा शेवटी त्यांनी सोबतच केला.
नांदुरा तालुक्यातील बेलुरा गावात मन हेलावून टाकणारी, हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. कर्जबाजारीपणाला कंटाळून पती-पत्नीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. वसंत जगदेव डांबरे (वय-७०) आणि सरलाबाई वसंत डामरे (वय-६५) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकरी दांपत्याचे नाव आहे. दोन एकर शेतीच्या भरोशावर हे कुटुंब संसाराचा गाडा ओढत होते. गेल्या काही दिवसांपासून सरलाबाई आजारी असल्याने त्यांच्या दवाखान्यासाठी मोठा खर्च झाला. घरखर्च, दवाखाना या कामासाठी बँकेचे कर्ज व इतर बाहेरचे खासगी कर्ज कुटुंबावर होते .सरला बाईंच्या दवाखान्यासाठी आणखी खर्च लागणार होता .आणखी पैसा आणायची कुठून या या विचारात वसंत होते. त्यामुळे दोघांनी रात्रीच मोनोसिल नावाच्या औषध प्राशन करून जीवन यात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरात हळू हळ व्यक्ती होत आहे .बोराखडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.