जळगाव प्रतिनिधी । नेक्सा शोरूमजवळ ड्रायव्हरला गाडी चालवताना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांच्या वाहनावरील ताबा सुटला. यामुळे दोन ते तीन दुचाकीस्वारांना कारने धडक दिली.
संजीव दिवाकर पानेकर (वय 62 रा. स्नेहल औंदजवळ पुणे) हे गुरुवारी एम.एच.12 क्यू एफ 1252 ने जळगाव शहराकडे येत होते. ते स्वतः कार चालवित होते. जामनेर-जळगाव महामार्गावरील नेक्सा शोरूमजवळ गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास महामार्गावर यादरम्यान त्यांना अचानकपणे हृदयविकाराचा झटका आला. नियंत्रण सुटल्याने त्यांची कारसमोर चालणार्या वाहनांवर धडकली. यात दोन ते तीन दुचाकीस्वार जखमी झाले. तसेच जळगावकडे येत असलेली एम.एच.14 डी.एन.9843 या क्रमांकाच्या कारला जोरदार धडक दिली.
यादरम्यान खेळ असलेल्या एका मुलाच्या पायावरुनही कारचे चाक गेल्याची माहिती मिळाली आहे. वेळीच नियंत्रण मिळाल्याने तसेच कार थांबल्याने दुर्घटना टळली. यादरम्यान ये जा करणार्या वाहनधारकांना प्रकार लक्षात आल्यावर तत्काळ हृदयविकार आलेल्या चालकास खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.