नवी दिल्ली, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | वाराणसीतील ‘ज्ञानव्यापी’ प्रकरणी सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोणतेही आदेश देऊ नयेत, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यानुसार दिवाणी न्यायालयाने २३ मे पर्यंत सुनावणी स्थगित केली आहे.
वाराणसीतील ‘ज्ञानव्यापी’ मशीद परिसरात सर्वेक्षण करण्यात आले. हिंदू पक्षकारांकडून अपरिहार्य कारणास्तव शपथपत्र सादर करण्यास वेळ मागण्यात आला. मुस्लीम पक्षकारांना कोणताही आक्षेप नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून २० मे पर्यंत सुनावणी स्थगिती देण्यात आली. तसेच विशेष आयुक्त यांनी सर्वेक्षण अहवाल सादर केल्यानंतर दोन्ही पक्षांकडून उत्तर सादर करण्यात आली. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वाराणसी न्यायालयाने कोणतेही आदेश देऊ नयेत असे निर्देश देण्यात आले आहेत.