जळगाव (प्रतिनिधी) खुप लोकांना जेवण झाल्यानंतर पान खाण्याची सवय असते. पान खाणे हे शरीरासाठी गुणकारी आहे. दक्षिण पुर्व आशियाई देशांमध्ये मात्र गेल्या दोन हजार वर्षापासून पान सरबत पिण्याची प्रथा आहे. पान खाणे किंवा पान सरबत हे श्वासोच्छवासाच्या विकारांसारख्या दुर्गंधी आणि खोकल्यासारखा आजारांना बरे करण्यास मदत करतात. पान सरबत हे एक ताजे पेय आहे.
नागवेलीच्या ताज्या पानांपासून आणि गुलकंदच्या स्वादातून हे पेय बनते, जे आपल्याला ताजेपणा देते. तुम्हाला जर पान खाण्याची इच्छा असेल तर पण उपलब्ध नसल्यास त्याऐवजी तूम्ही हे पानसरबतही घेवू शकता. पानसरबत हे ग्रीष्मकालीन पेय आहे.
यासाठी लागणारे साहित्य । नागवेलीचे पान, खडीसाखर, बडीशोप, गुलकंद, वेलदोडे आणि बर्फाचे तुकडे.
अशाचप्रकारच्या अन्य पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी ‘लाइव्ह ट्रेंडस् न्यूज’ला नियमित भेट देत राहा.