Home Cities जळगाव जागतिक महिला दिनी हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटतर्फे नारी शक्तीचा सन्मान

जागतिक महिला दिनी हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटतर्फे नारी शक्तीचा सन्मान


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जागतिक महिला दिनानिमित्त आपाआपल्या कार्यक्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या महिलांचा हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट च्या वतिने सन्मान करून स्त्री-शक्तीला सलाम करण्यात आला. याप्रसंगी सन्मानार्थीना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संघपाल तायडे यानी महिला दिनानिमित्त योग्य मार्गदर्शन करीत सायबर क्राईम बदल ही माहिती विषद केली.

यावेळी हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट च्या संचालीका भारती काळे यानी ही आपल्या मनोगत जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगत अनेक ऐतिहासिक महिला यांच्या कार्याची महती सांगत आईचे महत्त्व विशद केले.यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉक्टर स्वाती सोनवणे याच्या सह इन्स्टिट्यूट चे कर्मचारी यानी परिश्रम घेतले.

जागतिक महिला दिनानिमित्त हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या वतिने अलका शेरे, सोनी जाधव, मणी बारेला , रंगिता बारेला, प्रांजल कोळी, भाग्यश्री पाटील, माधुरी हिरोळे, सलमा पठाण, सुरेखा अहिरे, उज्वला पाटील, मोहिनी कोळी, संगीता रोकडे, छाया जगताप, राणी मगरे, अश्विनी कोचुरे, वैशाली काळे,करिष्मा अहिरे आदीचा सन्मान करण्यात आला.


Protected Content

Play sound