यावल प्रतिनिधी । तालुक्यातील आज डोंगरकठोरा येथे २३ फेब्रुवारीला रोजी भालोद प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत डोंगरकठोरा उपकेंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. हर्षल चौधरी यांनी कोरोना कोविड-१९ चा वाढता प्रदुर्भाव लक्षात घेता ग्रामपंचायत कार्यालयात येथे सर्व सदस्य सरपंच, उपसरपंच पोलीस पाटील यांना कोरोनाच्या दुसऱ्या टप्यातील संदर्भात मार्गदर्शन करून कोरोनाचे लक्षण कसे ओळखले जातात.
सविस्तर वृत्त असे की, मागील कोरोनापेक्षा हा आता वाढता कोरोना खूपच भयंकर आहे. त्यासाठी आपण आपल्या गावातील ग्रामस्थांनी कश्या प्रकारे काळजी घ्यायवची आहे, ते समजावून सांगितले व सदस्य डॉ. आर.सी. झाबरे यांनी सुद्धा कोरोनापासून कसा बचाव करावा ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले मी माझ्या दवाखान्यामध्ये नागरीकांसाठी मोफत टेम्परेचर व ऑक्षिमिटरने सर्व गावकऱ्यांची मोफत तपासणी करण्यात आहे. ज्यांना काही लक्षण असतील त्यांनी माझ्या दवाखान्याला येऊन आपली मोफत तपासणी करून घ्यावे व तसे काही आढळ्यास पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल किंवा कोविड सेंटरला दाखल होवुन उपचार करावा आणी आपली व परिवाराची काळजी घ्यावी. गावातील ग्रामस्थांनी मास्क न वापरल्यास प्रत्येकी ५० रुपये दंड वसुल करून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यात येणार असल्याचे माहीती देतांना ते बोलत होते.
नवनिर्वाचित सदस्य दिलीप तायडे जुम्मा तडवी यांनी सुद्धा कोरोनासंदर्भात व गावात कश्या प्रकारे सुरक्षितात राहील, याबद्दल माहिती मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले कि, आपले गाव आपली जबाबदारी म्हणून ग्रामविकास अधिकारी यांचा सल्ला घेऊन पुढील गावात कोरोना संदर्भात जनजागृती करावी असे सांगितले व बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची बसस्टॉपवर ओक्षिमीटरने व टेम्परेचर घेऊनच गावात प्रवेश द्यावा व रात्री बाहेरील लोकांना प्रवेश बंदी करावी असे नियोजन करण्यात आले. कार्यक्रमाला सर्व नवनिर्वाचित सरपंच नवाज तडवी, उपसरपंच धनराज पाटील, ग्रामविकास अधिकारी आर.सी.पवार, सदस्य दिलीप तायडे, मनोहर झांबरे, डॉ.आर. सि झांबरे, जुम्मा तडवी, कल्पना राणे, कल्पना पाटील, शबनम तडवी, शकीला तडवी, हेमलता जावळे, एश्वर्या कोलते, आशा आढाळे, पोलीस पाटील राजरत्न आढाळे, क्लर्क प्रदीप पाटील, शिपाई खेमचंद्र पाटील, सिमा कोल्हे. उपकेंद्राचे कर्मचारी डॉ. हर्षल चौधरी, आरोग्य सहाय्यक चेतन कुरकुरे, एल.व्ही.चौधरी आदींची उपस्थिती होती.