ग्रामीण भागातील रुग्णसेवेसाठी आरोग्य विभाग सदैव तत्पर : डॉ. एन.एस.चव्हाण

रावेर (प्रतिनिधी) दुर्गम भागातील आदिवासी आणि गरीब रुग्णाच्या सेवेसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सदैव तत्पर असून सर्व रोग निदान शिबिराचा लाभ घेवून नागरिकांनी आपल्या शारीरिक व्याधी दूर करून निरोगी आयुष्य जगावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन.एस. चव्हाण यांनी केले. ते पाल ग्रामीण रुग्णालयात आयोजित मोफत सर्व रोग निदान, दंत व शस्रक्रिया शिबिरात अध्यक्षीय भाषणातून बोलत केले.

 

सदर शिबिराचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.एस. कमलापूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून उषा चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप चौधरी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी.बी. बारेला उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ बी.बी. बारेला यांनी केले. यांनतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कमलापूरकर यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, आरोग्य यंत्रणेचा आढावा घेत असतांना आम्ही सर्वात आधी पाल सारख्या दुर्गम भागाचा आढावा घेवून शासनाच्या विविध आरोग्य विषयक योजना ग्रामीण भागात पोहाचविण्यावर आमचा भर देत आहोत. जनतेने याला प्रतिसाद देवून शासकीय यंत्रणेवर विश्वास दर्शविण्याचे आवाहन त्यांनी केले. शेवटी अध्यक्षीय भाषणात डॉ चव्हाण यांनी म्हटले की, जनसामान्य रुग्णांसाठी जन्म ते मृत्यू पर्यंतच्या विविध योजना आरोग्य विभागाकडून राबविण्यात येतात. यात अनेकदा आपल्याकडून आवश्यक कागदपत्रे नातेवाईक उपलब्ध करून देत नसल्याने अडचणी उपस्थित होतात. आपला लाभ आपल्याला मिळण्यासाठी आधार कार्ड आणि बँक पासबुक झेरॉक्स सोबत ठेवणे आवश्यक आहे. क्षयरोग, एडस, बाळंतपण, मातृत्ववंदन योजना आदी अनेक योजना शासकीय रुग्णालयात राबविण्यात येतात. त्याचा लाभ सर्वांनी घेवून सर्व रोग निदान शिबिरात शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्ह्यातील नामवंत तज्ज्ञ डॉक्टर मंडळी उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम फाउंडेशनचे सचिव दीपक नगरे यांनी केले. तर आभार डॉ संदीप चौधरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ सूची शर्मा, डॉ विनेश पावरा, डॉ. रवींद्र टिके, डॉ सोनाली बारेला, डॉ दीपक सोलंकी, डॉ गिरीश पाटील यांच्यासह मुख्य अधिपरिचारिका लता कोल्हे, नसरीन शेख, रमेश तनपुरे, शीतल चिंचखेडे, नैना कोळी औषध निर्माता के.एन.पाटील, रवी नागरे, जगदीश पाटील, आसिफ तडवी यांच्यासह सर्व आरोग्य कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. शिबिरात विविध आजारावरील जनजागृती करणारे पोस्टर, तपासणीसाठी स्टोल लावण्यात आले होते. तर पाल मोरव्हाल, लालमाती, निमड्या, गारखेडा, गारबर्डी आदी भागातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते

Add Comment

Protected Content