यावल(प्रतिनिधी)। असंसर्ग जन्य रोग निदान शिबिर एनसीडी कॅम्पस प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासिम अतंर्गत लंगडा अंबा, ऊसमळी आदिवासी गावात स्तनदा माता, गरोदर मातांची आरोग्य तपासणी शिबीराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन व दिप्रज्वलन करण्यात आले. डॉ.गौरव भोईटे यांनी कँम्प मधिल लाभार्थीची बी.पी., शुगर, HB६९ लाभार्थी यांची तपासणी करण्यात आली. रक्त संकलन माया संदानशिव (फेलोबटोमिस्ट महालँब) यांनी केले. औषध वितरण आरविंद जाधव यांनी केले.
विविध रोगांवर केले निदान व मार्गदर्शन
गरोदर माताची तपासणी आरोग्य सेविका पर्यवेक्षिका भुमिका सोनवणे, आरोग्य सेविका जुगरा तडवी यांनी केले. वसंतकुमार संदानशिव यांनी एचआयव्ही विषयावर माहिती व मार्गदर्शन केले. नोंदणी नेल्सन बारेला एमपीडब्ल्यू शिबीर संपन्न करण्यासाठी मनोज घारु, प्रकाश कोळी, आशावर्कर पौर्णिमा बारेला, लता बारेला, आंगणवाडी सेविका नसिम पिंजारी, मदतनीस महेंदाबाई बारेला आदीनी परिश्रम घेतले.