भुसावळ, प्रतिनिधी | येथील वांजोळा रोडवरील आपले परिवार सार्वजनिक वाचनालय व सद्गुरु धनजी महाराज प्रतिष्ठान आयोजित सार्वजनिक भव्य किर्तन महोत्सव ५ ते १२ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या सार्वजनिक भव्य कीर्तन महोत्सव अंतर्गत आरोग्यतपासणी शिबीऱाचा १०१३ नागरिकांना लाभ घेतला.
सार्वजनिक भव्य कीर्तन महोत्सव अंतर्गत आरोग्यतपासणी शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक डॉ. सुनील नेवे ,पिंटु ठाकूर, नगरसेविका शोभा नेमाडे, रजनी सावकारे, विनिता नेवे व शिबिरात सेवा देण्यासाठी आलेले जळगाव येथील सांधे प्रत्यारोपण व गुडघे तज्ञ डॉ. मनिष चौधरी , कार्डिओलॉजिस्ट डॉ. संदीप भारुडे, जनरल सर्जन डॉ. सुमित चौधरी, स्त्री रोग तज्ञ डॉ. प्रीती भारुडे, डॉ. चेतन कोळंबे, डॉ. पवन सरोदे ,बालरोगतज्ञ डॉ. सुयोग तन्निरवार, डॉ. प्रहिज फालक उपस्थित होते. याशिबिरात ३२० नागरिकांची रक्त तपासणी, गुढघे व सांधे प्रत्यारोपण तपासणी १९५, स्री रोग तपासणी १६२, बालरोगतज्ञ डॉक्टरांकडे १५२ व कॉर्डिओलॉजिस्ट डॉक्टरकडे १८४ नागरिकांनी तपासणी करुन घेतली. याशिबिरास किशोर चौधरी, गोविंद वराडे, अजय वाघोदे, सतीश ढाके, श्रीकांत पाटील, नेमिचंद धांडे, प्रदीप मनसुटे, उदय बोंडे, राहुल भारंबे, पराग पाटील, हर्षा पाटील यांनी सहकार्य केले. सप्ताहात ह.भ.प. भरत महाराज, मंगेश महाराज, डालेंद्र महाराज, भागवत महाराज, दिनेश महाराज, विशाल महाराज ,राजेंद्र महाराज ,तुळशीदास महाराज यांची प्रबोधनात्मक भक्तिमय किर्तने दररोज रात्री ठीक ८ वाजता होत आहे. सकाळी नऊ वाजेपासून मोफत रक्त तपासणी महालॅब अंतर्गत सी.बी.सी.(हिमोग्लोबिन) , कोलेस्टेरॉल , एच.आय.व्ही. , संधिवात( आर.ए.टेस्ट) या तपासण्या होतील. तसेच जळगाव येथील सांधे प्रत्यारोपण व गुडघे तज्ञ डॉ. मनिष चौधरी, कार्डिओलॉजिस्ट डॉ. संदीप भारुडे, जनरल सर्जन डॉ. सुमित चौधरी, स्त्री रोग तज्ञ डॉ. प्रीती भारुडे, डॉ. चेतन कोळंबे ,डॉ. पवन सरोदे, बालरोगतज्ञ डॉ. सुयोग तन्निरवार, डॉ. प्रहिज फालक यांनी, रुग्णांची मोफत तपासणी केली. ११ रोजी विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. १२ रोजी सकाळी नऊ वाजता भव्य दिंडी सोहळा होणार असून यात भुसावळ परिसरासह पंचक्रोशीतील सर्व कीर्तनकार ,टाळकरी, माळकरी, वारकरी, भजनी मंडळ यांचा सहभाग असणार असल्याने जणू वारकऱ्यांचे स्नेहसंमेलनच होणार आहे.दुपारी दोन वाजेपासून महाप्रसादाचे वितरण होऊन किर्तन महोत्सवाची सांगता होईल.