Home Cities चाळीसगाव आई फाऊंडेशतर्फे उंबरखेडला शिबीर

आई फाऊंडेशतर्फे उंबरखेडला शिबीर

0
35

aai foundation chalisgaon

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील आई फाऊंडेशनतर्फे तालुक्यातील उंबरखेड येथे महिला आरोग्य निदान व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात डॉ.विनोद कोतकर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, सुरक्षित मातेच्या हातात सुरक्षित व सुखरुप बाळ मिळणे म्हणजे नॉर्मल बाळंतपण असल्याने प्रत्येक महिलेने आरोग्यसंस्थेतच बाळंतपण करणे गरजेचे असल्याचे व त्यासाठी प्रोत्साहनपर निधी म्हणून जननी सुरक्षा योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य शासन करते. आपल्या कुटूंबातील अपत्यांची संख्या,त्यांचे पालनपोषण,संगोपन व त्यांचे भविष्य घडविण्याची जबाबदारी प्रत्येक स्त्रीला कुटूंबात घ्यावी लागत असल्याने शासनानेदेखील कुटूंबनियोजनाचे सर्वाधिकार हे महिलांना दिले असल्याचे डॉ विनोद कोतकर यांनी सांगितले.

डॉ. विनोद कोतकर पुढे म्हणाले की, कुटूंब नियोजनासाठीचे कॉपर टी (तांबी), गर्भनिरोधक गोळ्या ,गर्भनिरोधक इंजेक्शन्स किंवा संततीनियमन शस्त्रक्रिया याउपचारपध्दतीचा अवलंब महिलांनी करावा जेणेकरुन नको असलेली गर्भधारणा टाळता येवू शकते व महिलांचे त्यामुळे होणारे शारीरिक नुकसान आपण रोकू शकतो अशी माहिती त्यांनी दिली. या आरोग्य शिबिरात ४८ महिलांची मोफत तपासणी करण्यात येवून औषधोपचार करण्यात आला. याप्रसंगी उंबरखेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ विशाल पाटील, मेडीकल असोशिएशनचे माजी अध्यक्ष राजेंद्र पाटील, आई फाऊंडेशनचे सुधीर चव्हाण उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound