यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे बोराळे गावात नुकतेचे पाऊसाने झोडपले असून या मुसळधार पाण्यामुळे गावाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या नुकसानग्रस्त भागाची चुंचाळे येथील जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील यांनी पाहणी केली आहे.
तालुक्यातील चुंचाळे-बोराळे येथे (दि. ७ जुन) रोजी झालेल्या ढगफुटी सदृष्य जोरदार पाऊस झाला. या दरम्यान वीज कोसळुन बैल जोडीचा दुर्दैवी मुत्यू झाला. तसेच सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गायरानातील आदिवासी पावरा बांधवांच्या व चुंचाळे येथील जय भिम नगरातील रहिवाश्यांच्या घरात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. तसेच शेतकरी सुरेश धनगर यांच्या बैल जोडीवर वीज कोसळुन बैल जोडीचा दुर्दैवी मुत्यु झाला होता.तसेच गाव शिवारातील दोघे बंधाऱ्यावरील भराव वाहून गेले.
दरम्यान,दि.९ जुन रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदचे शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र उर्फ छोटु पाटील यांनी चुंचाळे गावास भेट देऊन शेतकरी बांधव आणीनुकसान झालेल्या ग्रामस्थांच्या घरी जाऊन शेतकऱ्यांना धीर देत शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ज्या घरामध्ये पाणी शिरले होते त्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी यावलचे तहसिलदार महेश पवार यांना सुचना दिल्या. चुंचाळ्यातील पुरात नुकसान झालेल्यांना भरपाई मिळविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असे रविन्द्र पाटील यांनी सांगितले. यावेळी यावल पंचायत समितीचे माजी प्रभारी सभापती दिपक पाटील, बोराळे उपसरपंच उज्जैंनसिंग राजपुत,साकळी ग्राम पंचायत सदस्य साहेबराव बडगुजर,चुंचाळे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष धनसिंग राजपुत,राजु सोनवणे,कोतवाल विशाल राजपुत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.