भुसावळ, प्रतिनिधी | आजच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात स्त्रीयांना स्वतःकडे आणि त्याहीपेक्षा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो किंवा स्वतःसाठी त्यावेळी काढत नाहीत ही गोष्ट लक्षात घेऊन इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ यांनी सर्व महिलांमध्ये स्वतःविषयी आरोग्य जागृती व्हावी म्हणून स्तन कॅन्सर व गर्भाशयाचा कॅन्सरवर मात करण्यासाठी महिलांची विनामूल्य बुधवार व गुरुवार असे दोन दिवशीय मेनोग्राफी व पेप्सीनियर टेस्ट करण्यात येत आहे.
महिलांसाठी घेण्यात येणारे आरोग्य शिबीर काल सुरु झालेले असून आज सुद्धा घेण्यात येत आहे. यात सकाळी ९ ते दुपारी चारपर्यंत या वेळेत महिला चेकअप करून घेऊ शकणार आहेत तरी याचा सर्वांनी सर्व महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन इनरव्हील क्लब भुसावळच्या अध्यक्षा स्वाती देव यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी ठाण्याचे रोटेरियन श्रीनिवास नारखेडे, आयपीडीजी राजू शर्मा, सीसीसीसी रेशमी शर्मा, सेक्रेटरी वंदना पारे, डॉ. संगीता चांडक, विकास पांडे, प्रतिष्ठा महिला मंडळ अध्यक्षा रजनी सावकारे उपस्थित होत्या. यशस्वीतेसाठी पीपी कमल सचदेव, आयएसओ रूचिका शर्मा, सीसी अलका भरकर, विद्या भोळे, मनीषा वानखेडे ,अशा चौधरी, मनीषा राणे, जयश्री ओक आदी करीत आहेत.