दिल्लीत उभारले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशाच्या राजधानीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नवं मुख्यालय उभे राहते आहे. या मुख्यालयाचे काम जवळपास संपत आले आहे. १२ मजली इमारतीत संघाचं मुख्यालय विस्तारले आहे. संघाचे नवे मुख्यालय दिल्लीत उभे राहते आहे. ही इमारत बारा मजल्यांची आहे. या इमारतीबाबत हरकत प्रमाणपत्र मिळावं म्हणून ऑगस्टमध्येच अर्ज करण्यात आला होता. दिल्लीच्या अर्बन आर्ट्स कमिशनने याला मान्यता दिली आहे. हे मुख्यालय जवळपास बांधून तयार आहे.

ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी जो ऑनलाईन अर्ज करण्यात आला होता त्यात बांधकामाचा तेव्हापर्यंतचा तपशी, इमारतीचं स्केच, फोटो, सद्यस्थितीतले फोटो हे सगळंही पाठवण्यात आलं होतं. या प्रकल्पाला सीसी म्हणजेच कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळण्याआधी एनओसीची गरज असते. ते देण्यात आलं आहे. दिल्लीतल्या केशवकुंज या ठिकाणी ही इमारत उभारण्यात आली आहे.

नोव्हेंबर २०१६ मध्ये या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर या ठिकाणी मोठी इमारत बांधण्यात आली. संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी एकूण तीन टॉवर उभारण्यात आले आहेत जे १२ मजली आहेत. ग्राऊंड प्लस बारा मजले प्रत्येक टॉवरमध्ये आहेत. केशवकुंज असं या इमारत संकुलाचं नाव आहे. यामध्ये एकूण १३ लिफ्ट आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या टॉवरमध्ये प्रत्येकी पाच लिफ्ट आहेत तर तिसऱ्या टॉवरमध्ये तीन लिफ्ट आहेत. प्रत्येक टॉवरमध्ये एक सर्व्हिस लिफ्टही आहे. केशवकुंजचं आधीचं प्रवेशद्वार जिथे होतं तिथेच नवं प्रवेशद्वारही तयार करण्यात आलं आहे.

 

Protected Content