पहूर येथे विद्यार्थी हित जोपासण्यासाठी मुख्याध्यापकाची धडपड

 

6053ffbd d70f 4af1 b047 49c108e5130d 1

पहूर, ता.जामनेर (प्रतिनिधी)   शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आणि विद्यार्थी हित जोपासण्यासाठी येथील मुख्याध्यापक पी.टी.पाटील हे प्रत्यक्ष पालकांना भेटून जिल्हा परिषद शाळेचे महत्व छापलेले पत्रक देवून पटवून देत आहेत. या भेटीदरम्यान पालकांना आवाहन करीत आहे की, जिल्हा परिषदेच्या शाळेतच आपल्या पाल्यांना दाखल करा. त्या शाळेतच विद्यार्थ्यांची खरी जडणघडण होत असते. जि.प.च्या शाळेतच मुल्यशिक्षण व गुणवत्तापुर्ण असे शिक्षण मिळते.

 

येथील संतोषीमातानगरातील जि.प. शाळेत विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. स्वयंशिस्तीचे धडे, स्वच्छता व टापटीपपणा, मराठी मातृभाषेतून गणित, इतिहास, विज्ञान, भूगोल, नागरिकशास्त्र, कला, कार्यानुभव, शारिरीक शिक्षण असे उपयुक्त विषय शाळेत प्रामाणिकपणे शिकवले जातात. शिक्षण विभागाचे अधिकारी, माता-पालक, शिक्षक-पालक, शालेय व्यवस्थापन समितीच्या सभेतून शैक्षणिक गुणवत्तेविषयी माहिती दिली जाते.

गोर-गरीबांच्या मुलांचे शिक्षण व्हावे, जि.प.च्या शाळेविषयी आवड निर्माण व्हावी, तसेच विद्यार्थी पटसंख्या व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शाळेत जून २०१९ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली सेमी वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय व्यवस्थापन समितीने घेतलेला आहे.शाळेचे मुख्याध्यापक पी.टी.पाटील हे शाळेत नाविण्यपुर्ण शैक्षणिक उपक्रम स्वखर्चाने राबवित आहेत. त्यांना शाळेतील शिक्षकांचा व पालकांचा प्रतिसाद मिळत असल्याने विद्यार्थी हित जोपासण्यासाठी त्यांची ही उन्हाळ्याच्या सुटीतील धडपड सुरू आहे.

Add Comment

Protected Content