मुख्याध्यापक एम.के. महाजन यांचा ‘सेवापुर्ति सोहळा’ उत्साहात

1168c1ce d216 4652 8a15 f0d12425cd8a

 

धरणगाव (प्रतिनिधी) येथील महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक एम.के. महाजन यांचा सेवापुर्ति सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी.डी. पाटील यांनी केले. याप्रसंगी सेवापुर्ति सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मा.एस.आर. महाजन होते. तर प्रमुख अतिथी व सत्कार मुर्ति माजी मुख्याध्यापक एम.के. महाजन सर सहकुटुंब -सहपरिवार उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले व विद्येची खरी देवता सावित्री माई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक एस.आर. महाजन यांनी माजी मुख्याध्यापक एम.के. महाजन सर यांचा पुष्पगुच्छ – शाल – श्रीफळ – देऊन सत्कार केला. सरांच्या धर्मपत्नी यांना पी.आर. सोनवणे मॅडम यांनी साडी व गुलाबपुष्प देऊन सन्मानित केले. उपस्थित कुटुंबातील सदस्यांचे स्वागत शिक्षक बंधु -भगिनी यांनी केले. याप्रसंगी शाळेच्या वतीने एम.के. महाजन यांना संत शिरोमणी सावता महाराज यांची मूर्ती भेट म्हणुन देण्यात आली. याप्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी यांनी बहुजन प्रतिपालक, कुळवाडीभुषण छत्रपती शिवाजी महाराज यांची फोटो फ्रेम भेट दिली.

याप्रसंगी शाळेतील जेष्ठ शिक्षीका पी.आर. सोनवणे मॅडम व इ.१० वी ची विद्यार्थिनी श्रद्धा पाटील, मयुर महाजन व स्नेहल महाजन, माजी विद्यार्थी गोपाल महाजन यांनी मनोगतातून एम. के. महाजन सर यांनी केलेली सेवा,शिस्त, प्रामाणिक केलेले काम आणि वेळोवेळी विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन याविषयी सविस्तर मनोगत व्यक्त केले.

यानंतर सत्कारमुर्ति मा.एम.के. महाजन यांनी आपला जीवन संघर्ष उलगडला. माझे विद्यार्थी आज मोठ- मोठे पदावर आहेत. हीच माझ्या सेवेची खरी पावती, असे ते म्हणाले. मी शाळेच्या प्रगतीसाठी नेहमी तयार असेल. माझ्याने शक्य तेवढी मदत मी शाळेला नेहमी करत राहील. याप्रसंगी विद्यार्थ्यांना खुप -खुप शिका व शाळेचे नाव मोठे करा असा संदेश दिला. शाळेने माझा सेवापूर्ति सोहळा केला म्हणुन मनापासुन शाळेचे आभार मानले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष एस.आर. महाजन यांनी सरांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकुन जुन्या आठवणींना उजाळा दिला. सरांचे निवृत्तीनंतर चे आयुष्य सुख -समृध्दी – समाधानाचे – आनंदाचे जाओ व पुढील वाटचालीस खुप -खुप शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सत्कारमुर्ति एम.के. महाजन सर यांच्याकडुन शाळेतील सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक बंधु – भगिनी व कर्मचारी वृंद यांना पोहे व जिलेबीचा अल्पोहार देण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पी.डी. पाटील तर आभार व्ही.टी. माळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधु -भगिनी व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.

Protected Content