घरातून चावी काढून दुचाकी लांबविली

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । दांडेकर शहरात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील दुचाकीच्या चाव्या घेऊन अंगणात उभी असलेली दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश भगवानदास लाठी वय 46 हे व्यापारी असून 13 जानेवारी 2022 ते १९ जानेवारी 2012 दरम्यान त्यांनी त्यांचे घराचा लोखंडे व लाकडी दरवाजाचे तसेच गेटचे कडे कोंडा तसेच कुलूप तोडून घरात प्रवेश केला घरातून दुचाकीची चावी मिळवून अंगणात उभी दुचाकी चोरून नेली. प्रकार समोर आल्यानंतर दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला.

मात्र चार महिने उलटूनही दुचाकी मिळून न आल्याने शुक्रवार 27 मे रोजी योगेश लाटे यांनी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुशील करीत आहेत आहे.

 

Protected Content