जामनेर प्रतिनिधी । जामनेर खडकी रोडवरून दुचाकीने घरी जात असलेल्या तरूणाला एक अनोळखी व्यक्तीने रस्ता आडवून त्यांच्याजवळील ३४ हजार रूपयांची रोकड आणि मोबाईल असा एकुणन २३९ हजार रूपयांचा मुद्देमाल जबरी हिसकावून लंपास केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, कवीराज प्रभाकर हरणे (वय-२७) रा. शंकरनगर हिवरखेडा रोड जामनेर हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. ते बचत गटाची वसूलीचे काम करतात. २२ ऑक्टोबर रोजी दिवसभर बचत गटाचे वसुलीचे काम करून दुचाकी (एमएच १७ बीएच ५०५९) ने जामनेर येथे घरी जात असतांना खडकी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर एका अज्ञात व्यक्तीने त्यांचा रस्ता आडवून त्यांच्या डोक्यांला व कपाळाला लाकडी दांड्याने वार करून जखमी केले आणि ताब्यातील ३४ हजार ३८० रूपयांची रोकड आणि ५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून घेतला. जखमीवस्थेत त्यांनी खासगी रूग्णालयात उपचार घेवून जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि दिलीप राठोड करीत आहे.