यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यंदाच्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने शेतकरी बांधव अनेक संकट आणि अडचणीत आले असुन त्यांना रब्बी पिकांच्या पेरणीस पाण्याची कमतरता होवु नये याकरीता भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष युवा नेतृत्व अमोल हरीभाऊ जावळे यांनी शेतकऱ्यांच्या पिक पेरणीनंतर उद्धभवणाऱ्या पाणीच्या समस्याचे निराकरण करण्याच्या दृष्टीने व शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगला निर्णय घेत संबधीत कार्यालयास आपले पत्र पाठवून अधिकारी यांना मागणी केली आहे.
या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी तापी पाटबंधारे विभाग जळगाव येथे पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की आपल्या परिसरातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामा करीता हतनुर कालव्याला लवकरात लवकर आवर्तन सोडावे म्हणून लेखी स्वरूपात निवेदन देत पाणी लवकर सोडावे जेणे करुन शेतकरी बांधवांच्या रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात रब्बी पिकांची पेरणीस सुरुवात केलेली आहे .परंतु या वर्षी जळगाव जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पावसाळ्यात हवा त्या प्रमाणात पाउस झाला नसल्या कारणाने शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे सदर नुकसान भरून निघावे तसेच शेतकऱ्यांना मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध व्हावा या साठी हतनुर धरणाच्या उजव्या कालव्याला आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी तापी पाटबांधारे विकास महामंडळ जळगावचे मुख्य अभीयंता श्री बोरकर यांच्याकडे केली आहे .