अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील बाजार समितीजवळ प्लायवूडच्या दुकानाला शॉर्ट सर्किटने आग लागून सुमारे साडे १२ लाखाचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी १३ जुलै रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. अग्निशमन दलाने वेळीच आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला. यात व्यावसायिकाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. या घटनेबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुभम पवार यांचे बाजार समितीजवळ श्रीदत्त हार्डवेअर नावाचे दुकान आहे. शनिवारी १३ जुलै रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास श्रीदत्त हार्डवेअरला आग लागल्याची माहिती शुभम पवार यांना मिळाली. त्यांनी अमळनेर नगरपरिषदेचे अग्निशमन विभागाशी संपर्क साधुन आग लागल्याची माहिती दिली. त्यानुसार अग्निशमन दल घटनास्थळी दाखल करण्यात आले. त्याठिकाणी विद्युत प्रवाह सुरू असल्यामुळे वायरमन आकाश वाडीले याने वीजपुरवठा बंद केला. अग्निशमन दल प्रमुख दिनेश बिऱ्हाडे , फारुख शेख, जफर पठाण, भिकन पठाण, मच्छिन्द्र चौधरी यांनी तातडीने आग विझवल्याने आजूबाजूच्या दुकानांना आग लागू शकली नाही. मात्र पवार यांच्या दुकानातील सर्व ऑईलपेंट, रंग तयार करण्याचे मशीन, सर्व प्लायवूड जळून खाक झाले होते. शुभम पवार यांचे सुमारे १२ लाख ५० हजारांचे नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे पहाटे दोन वाजेच्या सुमारास आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.