हार्दिक पटेल लोकसभा निवडणूक लढवणार

लखनऊ (वृत्तसंस्था) गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे घोषणा लखनऊमध्ये एका सभेत केली आहे. हार्दिक पटेलने वयाची पंचवीशी पूर्ण केली आहे. यापूर्वी निवडणूक लढवण्यासाठी त्याचे वय बसत नव्हते.

 

गुजरातमधील पाटीदार समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनामुळे हार्दिकने एक युवा नेता अशी ओळख निर्माण केली होती. दरम्यान, त्याने जनतेच्या मुद्द्यांवरुन मोदी सरकारला वेळोवेळी धारेवर धरले आहे. हार्दिकने अनेकदा उपोषण, आंदोलने केली. समविचारी संघटनांच्या तो कायमच व्यासपीठावर दिसला होता. २०१७ मध्ये हार्दिकने सभेत बोलताना अजून माझे वय तर होऊ द्या, असे म्हणत सूचक विधान केले होते. नुकतेच त्याने निवडणूक लढवण्याचा इन्कारही केला होता. दरम्यान, काँग्रेसचा हार्दिकला कायमच पाठिंबा दिला असून जर हार्दिकचा विचार असेल तर त्याला आम्ही उमेदवारी देऊ, असे गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष भारतसिंह सोलंकी यांनी म्हटले होते. त्यामुळे जर हार्दिक खरोखरच लोकसभा लढवण्यात तयार असेल तर तो गुजरातच्या अमरेली मतदारसंघातून निवडणुक लढवण्याची शक्यता आहे. हार्दिकला पाठींबा देताना या ठिकाणी काँग्रेस आपला उमेदवार देणार नाही. दरम्यान, यावर अद्याप भाजप किंवा इतर पक्षांकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Add Comment

Protected Content