Home राजकीय हार्दिक पटेल याने दिले मोदींना प्रतिआव्हान

हार्दिक पटेल याने दिले मोदींना प्रतिआव्हान

download 1
download 1


download 1

भोपाळ (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी प्रतिआव्हान दिले आहे की, काँग्रेसला राजीव गांधींच्या नावावर निवडणूक लढा, असे सांगण्यापेक्षा तूमच्यात हिंमत असेल तर दोन कोटी रोजगारांच्या आश्वासनांवर मते मागा, असे आव्हान हार्दिक पटेल याने भोपाळमध्ये बोलतांना मोदींना दिले आहे.

 

२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींनी दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचा संदर्भ देत हार्दिक पटेलने मोदींना हे आव्हान दिले आहे. उत्तर प्रदेशातल्या प्रतापगढमध्ये शनिवारी झालेल्या रॅलीत पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना लक्ष्य करताना त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधींवरही टीका केली होती. त्यावेळी त्यांनी राजीव गांधींचा उल्लेख भ्रष्टाचारी नंबर वन असा केला होता. मोदींच्या याच टीकेला हार्दिक पटेल यानी उत्तर दिले आहे. मोदींनी भाषणाच्या आवेशात ते विधान केले, असे मला वाटले होते. मात्र त्यानंतरच्या सभांमध्येही मोदींनी त्याची पुनरावृत्ती केली,’ असे पटेल यांनी यावेळी म्हटले. मोदींकडे त्यांच्या कामाबद्दल बोलण्यास काहीच नसल्याने ते अशी वक्तव्ये करत असल्याची टीकाही हार्दिक पटेल यांनी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound