Home क्राईम नगरदेवळा अत्याचारप्रकरण; नराधमास कठोर शिक्षेची मागणी

नगरदेवळा अत्याचारप्रकरण; नराधमास कठोर शिक्षेची मागणी


civil bhadgaon crime

जळगाव प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्यात आली होती. याबाबत आज शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात जळगाव शहरातील सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी भेट देवून दिला दिला. याप्रकरणी अत्याचार करणाऱ्या व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी आणि जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक यांना मागणीचे निवेदन देण्यात येणार आहे.

सविस्तर माहिती
पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून एका ३६ वर्षीय नराधमाने तीन वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना २६ मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर नगरदेवळा परिसरात संतप्त भावना उमटत असतानाच पाचोरा पोलिसांनी आरोपीला काही तासातच अटक केली होती

नगरदेवळा गावातील आरोपी किशोर निंबा भोई (वय-३६) याच्या घराशेजारी राहणाऱ्या एका कुटुंबात तीन वर्षाच्या चिमुकल्या बालिकेस या नराधमाने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरात बोलावून घेतले दुपारी दोन वाजेच्या सुमारास आरोपीच्या घरी कुणीही नसताना त्याने या बालिकेवर बलात्कार केला या घटनेमुळे काही वेळाने सदरची बालिका रडायला लागल्यामुळे तिची आई घटनास्थळी धावत आल्याने घटनेचा उलगडा झाला त्यानंतर मुलीच्या आई वडील व नातेवाईकांनी पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती दिली त्यानुसार पोलिसांनी तत्पर कारवाई करत आरोपीस अटक करण्यात आली होती. पुढील तपासणी व उपचारासाठी जळगाव सामान्य रुग्णालयामध्ये रवाना करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound