मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हरताळे येथे छत्रपती फाऊंडेशन व राजमाता जिजाऊ गोशाळा यांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रेरणादायी शिव व्याख्यान तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली.
कार्यक्रमात शिवश्री वैभव तायडे यांनी युवा पिढीसाठी प्रेरणादायी विचार मांडले. व्याख्यानातून त्यांनी शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेचे सुंदर विवेचन केले. तसेच, गावातील युवकांनी सजीव देखाव्यांद्वारे महाराजांच्या जीवनप्रवासाचे दर्शन घडवले, ज्याला मोठ्या प्रमाणात उपस्थितांनी दाद दिली.
या सोहळ्याला मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी यांनी भेट देऊन उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. तसेच, बंटी पाटील, वैभव तायडे, छोटू भड, श्रीकृष्ण सोनवणे, महेश भोईटे, शुभम शेळके, गौरव शेळके, आकाश शेळके, चंदन उदळकर, अजय उदळकर, पणु मुलांडे, कमलेश भगत, मनोज बेंडवाल, पवन देशमुख आदी गावकऱ्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव तायडे यांनी केले तर आभारप्रदर्शन छोटू भड यांनी केले.