जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील हरीविठ्ठल नगरातील माहेर असलेल्या विवाहितेला कारण नसतांना शिवीगाळ करत मारहाण करून धमकी दिल्याचा प्रकार मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी उघडकीला आला आहे. याप्रकरणी रविवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरात माहेर असलेल्या मेहक इम्रान पटेल (वय-२३) रा. हरीविठ्ठल नगर, नवनाथ चौक, जळगाव याचा विवाह सुप्रिम कॉलनीतील इम्रान रमजान पटेल यांच्याशी झालेला आहे. लग्नाचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती इम्रान याने काहीही कारण नसतांना शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सासू, सासरे, जेठ, जेठाणी, ननंद यांनी देखील त्रास देणे सुरू केले. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. रविवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती इम्रान रमजान पटेल, सासू रईसाबी रमजान पटेल, जेठ इरफान रमजान पटले, जेठाणी जुलनाज इरफान पटेल, ननंद अस्मिता आतीक पटेल सर्व रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव यांच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रशांत पाठक करीत आहे.