जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात प्लॉट घ्यायचा व मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठी माहेरुन पैसे आणावे, यासाठी पोलीस मुख्यालय परिसरात राहणाऱ्या विवाहितेचा छळ केला जात असल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती आशी की, पोलीस मुख्यालयातील माहेरवाशीन पुनम जितेंद्र परदेशी यांचा विवाह छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील नांगद येथील जितेंद्र प्रताप परदेशी यांच्याशी प्रेमविवाह झाला आहे. प्रेमविवाह केल्याच्या रागातून विवाहितेचे जेठ व जेठानीसह सासू सासऱ्यांकडून विवाहितेचा छळ सुरु केला. तसेच जळगाव येथे प्लॉट घेण्यासाठी विवाहितेने माहेरुन ४ ते ५ लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार विवाहितेने साडेतीन लाख रुपये देखील दिले आहे. त्यानंतर देखील विवाहितेच्या पतीकडून मुलाच्या शाळेची फि भरण्यासाठी माहेरुन ५० हजार रुपयांची मागणी केली. तसेच ड्युटीवर जाण्यासाठी बुलेटची मागणी केली. परंतु त्यांची मागणी पुर्ण न झाल्यामुळे सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ सुरु होता. हा छळ असह्य झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यांनी शुक्रवारी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती जितेंद्र प्रताप परदेशी, जेठ दीपक प्रताप परदेशी, जेठाणी ज्योती दीपक परदेशी, सासू निर्मला प्रताप परदेशी, सासरे प्रताप लालचंद परदेशी सर्व रा. पांगरे पोस्ट नांगद, ता. कन्नड जि. छत्रपती संभाजी नगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.